मोदींनी द्वेषाचे राजकारण केले - राहुल गांधी !

Foto
नवी दिल्‍ली:  जनतेशी निगडीत असलेले प्रश्‍न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. 
लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वेषाचे राजकारण केले. आम्ही प्रेम केले आणि प्रेमाचा नक्‍कीच विजय होईल, असा विश्‍वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्‍त केला.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज दिल्‍लीतील औरंगजेब लेन येथील एन. पी. सीनिअर सेकंडरी स्कूलमधील केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्‍ला चढवला. गांधी म्हणाले, आम्ही ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर लढवली.  पहिला मुद्दा बेरोजगारी, दुसरा शेतकर्‍यांच्या समस्या, तिसरा सर्वात मोठा मुद्दा नोटाबंदी तर चौथा मुद्दा भ्रष्टाचार-राफेल खरेदी करार-अनिल अंबानी हा आहे.